| पाली/गोमाशी | वार्ताहर |
कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली संचलित आदिवासी आश्रमशाळा पडसरे येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रवेशोत्सव 15 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत महागांवच्या सरपंच दिपिका सुतार यांच्या शुभहस्ते प्रवेशोत्सव करण्यात आला.
नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लेझीम-बेंजो पथकने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, चॉकलेट देण्यात आले. पहिल्याच दिवशी शैक्षणिक खेळ, बौद्धिक खेळ, शारीरिक खेळ इत्यादी मनोरंजक खेळ खेळून मुलांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पाठयपुस्तके आणि स्कूल बॅग देण्यात आल्या. याप्रसंगी पेण प्रकल्प कार्यालयातील देवडे, विजय सुतार, पालकवर्ग उपस्थित होते. प्रवेशोत्सवाचे नियोजन मुख्याध्यापक संदिप शिंदे, मुख्याध्यापिका मीनाक्षी ढोपे, शिक्षक वर्ग, अधीक्षक, कर्मचारी वर्ग यांनी केले.