अलिबागमध्ये उद्योजकता जागृती कार्यक्रम

ईडीआयद्वारा देण्यात येणार प्रशिक्षण

| अलिबाग | वार्ताहर |

भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स मुंबईद्वारा आयोजित अलिबाग येथे जिल्हा उद्योक केंद्र, रायगड बाजार समोर अलिबाग येथे (दि.9) मे रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच प्रवर्गातील महिला, बचत गटातील महिला व दिव्यांग महिला व पुरुष यांच्याकरिता तीन आठवडे कालावधीच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती व्हावी, प्रशिक्षणाचा उद्देश माहिती व्हावा याकरिता उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत पुरस्कृत व भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. महिलांनी आत्मनिर्भर होऊन शाश्‍वत उपजीविकेचे साधन निर्माण करावे याकरिता विविध विषयांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजकीय गुण, उद्योग संधी, समस्यांचे निराकरण, सिद्धी प्रेरणा, बाजारपेठ सर्वेक्षण, बाजारपेठ तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, संवाद कौशल्य, ग्राहक संबंध, प्रकल्प अहवाल, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीकरिता शशिकांत दनोरीकर, प्रकल्प अधिकारी, मधुकुंज बिल्डिंग, एसटी डेपोसमोर, अलिबाग 7775802497 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version