| पनवेल | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या नेतृत्वखाली मंगळवारी कामोठे वसाहतीमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुणांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने तरुण नेतृत्व, सामाजिक क्षेत्रात सहकार्य असणारे रत्नाकर वायदंडे यांच्यासह अनेक तरुणांनी माजी सभापती सखाराम पाटील, शहर संघटक अल्पेश माने, रमेश गोरे, नितीन पगारे, नाना भगत, नाना मुळीक, मलेश भट्ट, मंगेश चिमन आदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. पक्षात प्रवेश करणाऱ्या तरुणांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन यावेळी शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी दिले आहे.