पर्यावरणीय कायदेशीर साक्षरता कार्यक्रम

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

तालुका विधी सेवा समिती पनवेल, वकील संघटना पनवेल आणि पंचायत समिती पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे रक्षण करा, उद्या सुरक्षित करा या विषयावर आधारित पर्यावरणीय कायदेशीर साक्षरता व समुदाय संरक्षण उपक्रम अंतर्गत जनजागृती कार्यक्रम पळस्पे येथे यशस्वीपणे संपन्न झाला.

हा कार्यक्रम पळस्पे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी 110 नागरिकांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रदूषणग्रस्त भागांतील असुरक्षित समुदायांमध्ये पर्यावरणीय कायद्यांविषयी साक्षरता वाढवणे, उच्च प्रदूषण पातळीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य धोक्यांबाबत जनजागृती करणे, प्रदूषणाच्या संपर्क संदर्भातील गैरसमज दूर करणे. तसेच, पर्यावरणीय कायद्यांतर्गत उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणांपर्यंत नागरिकांना पोहोचण्यास मदत करणे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी समीर वाठारकर, ॲड. दिपाली बोहरा, शैलेश कोंडसकर ॲड. सुयश कामेरकर, ॲड. अंकुश कुळये हेमंत आंबेतकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामविकास अधिकारी सुदिन पाटील यांनी केले होते.

Exit mobile version