गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक कापडी मखर

कशेळे येथील तरुणाचा व्यवसाय

| नेरळ | वार्ताहर |

गणेश उत्सव म्हटलं कि प्रत्येक गणेश भक्ताला काय करू काय नको करू असे झालेले असते. त्यात सर्वाधिक आकर्षण असते ते गणेश सजावटीची आणि ती गणेश सजावट पर्यावरण पूरक इको फ्रेंडली असावी असा ज्यांचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी विविध रंगाच्या कापडाने तयार झालेल्या मखर या सर्वांच्या आकर्षण बनल्या आहेत. त्या सर्व कापडी मखर यांची निर्मिती कर्जत तालुक्यातील कशेळे जवळील पोखरकरवाडी या लहानशा गावात होते. पोखरकरवाडी या ठिकाणी राहणारा भरत आवारी हा तरुण कर्जत येथे आपल्या आपल्या फावल्या वेळी समारंभमधील कापडी मंडपाचे काही भाग शिलाई मारून जुळविण्याचे आणि दुरुस्त करण्याचे काम करायचा.


कारखान्यात 40 तरुण टेलरिंगचे काम करीत असून सर्व तरुण हे त्यांच्याच गावातील आहेत. त्यांना वर्षभर काम मिळत असल्याने त्यांच्याकडून देखील कामात कोणतीही हयगय केली जात नाही. त्यात महिला वर्गाला देखील त्यांच्या घरी बसून काम उपलब्ध करून आवारी बंधू यशस्वी झाले आहेत. ते सर्व तरुण गेली अनेक वर्षांपासून भरत आवारी यांची साथ देत असून त्यांच्या मेहनतीमुळे प्राची कारखाना स्पर्धेत टिकून आहे. या कारखान्यात प्रामुख्याने गणेश उत्साहापूर्वी मोठे काम असते. त्यासाठी दोन महिन्याचे काळात किमान एक लाखाचा सजावटी त्या कारागिरांना तयार कराव्या लागतात. त्यांच्या कारखान्यातून पर्यावरण पूरक मखर म्हणून वापरले जाणारे कापडी मखर जून महिन्यापासून उल्हासनगर, मुंबई, कोकण, नाशिक आणि पुणे येथील होलसेल व्यवसाय करणारे व्यापारी यांना हा माल जात असतो, त्याचवेळी रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात हा माल किरकोळ व्यापार्‍यांना दिला जातो. त्यासाठी जवळपासचा माल मुंबई, पुणे येथे पोहचत असतो. त्यामुळे पोखरकर वाडी हि पर्यावरण पूरक मखर आणि सजावटी यामुळे आनंदी असल्याचे भरत आवारी सांगतात.

Exit mobile version