यूपीएससी परीक्षेतील निबंधाचा पेपर फुटला

| पुणे | प्रतिनिधी |

यूपीएससी परीक्षेतील निबंधाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पुण्यातील खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाला होता, असा आरोप विद्यार्थ्यांनी केल्याने यूपीएससीच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे.

देशभरात पूजा खेडकर प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता हा नवीन आरोप करण्यात आला आहे. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील निबंध आधीच प्रसिद्ध झाल्याचा आरोप पुण्यातील विद्यार्थ्यांनी केला आहे. देअर इज नो पाथ टु हॅपिनेस, हॅपिनेस इज द पाथ हा निबंध एका खासगी क्लासने आधीच प्रसिद्ध केला होता. हाच निबंधाचा विषय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत जसाच्या तसा आला, असा आरोप परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी केला आहे. या निबंध परीक्षेत 125 गुणांसाठी विचारला जातो आणि तोच जसाच्या तसा यूपीएससीच्या परीक्षेत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबद्दल पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. यूपीएससीची ही परीक्षा आजच झाली असून, हा निबंधाचा पेपप रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. खासगी क्लासचा निबंधाचा विषय यूपीएससीच्या परीक्षेत कसा आला? याची चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

Exit mobile version