। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टीकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये करिअर कट्टा या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत करिअर संसदेची स्थापना करण्यात आली. यावेळी करीअर संसदेच्या सर्व पदाधिकार्यांना करिअर कट्टा तालुका समन्वयक अशोक मोरे यांनी शपथ दिली. करिअर कट्टा या शासनाच्या योजने मा़र्फत प्रत्त्येक महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांना फक्त 365 रूपये भरून 3 वर्ष ऑनलाईन स्पर्धापरीक्षांच्या संदर्भात दररोज सायंकाली मार्गदर्शन केले जाते.
यामध्ये आयएएस आपल्या भेटीला, उदयोजक आपल्या भेटीला स्पर्धापरीक्षांचे स्वरूप पोलिस भरती संबंधी मार्गदर्शक असे विवीध उपक्रम राबविले जातात.आपल्या महाविद्यालयात देखिल करिअर कट्टयाची स्थापना यापूर्वी करण्यात आल्याचे हर्शल जोशी यांनी सांगितले तसेच महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या एकुण 50 विध्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करण्याचे करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. नितीन मुटकुले यांनी सांगितले.
यावेली जगदीश शिगवण, नितिन मुटकुले, भारत पवार, निकिता मांडवकर, अमित बाकाडे, दिलिप ढेपे, संजय गायकवाड व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







