| पनवेल | वार्ताहर |
रोटरी खारघर मीडटाऊनतर्फे खारघरच्या शासकीय मुर्बी शाळेत लायब्ररी-ग्रंथालय स्थापित करण्यात आले. रोटरी खारघर मीडटाऊन आणि एमपीरियान शाळेतल्या इनट्रॅक क्लबच्या मुलांनी 100 – 125 पुस्तके दिली. रोटरी खारघर मीडटाऊनचे अध्यक्ष रो. अनुप गुप्ता यांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या अध्यापिका श्रीमती म्हात्रे यांच्या सहयोगाने ही ग्रंथालय स्थापित करण्यात आली. यावेळी रो. सेक्रेटरी डॉ. रवी किरण, न्यू जनरेशन डायरेक्टर रो. अनामिका, रो. शुभांगी, रो. दीपा पटेल, शाळेतले सर्व शिक्षक, मुले व स्टाफ उपस्थित होता.