नवी मुंबई | प्रतिनिधी |
भविष्यात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर एकाही रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी नेरुळ, नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे.
भारतातील उद्वाहन (लिफ्ट ) बनविणार्या शिंडलर या कंपनीने तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. शिंडलर कंपनीच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांना या ऑक्सिजन प्लांटची भेट मिळाली आहे. हा ऑक्सिजन प्लांट पीएसए या टेक्नोलॉजी च्या मदतीने बनविला असून दर दिवशी ऑक्सिजन प्लांट मधून रोज 98 जंबो ऑक्सिजन सिलेंडर भरता येणार आहेत. या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाच्या प्रसंगी शिंडलर कंपनीच्या मुख्य पीपल ऑफिसर शीतल शहा, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मल्हार राणाजगजीतसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.