टीएमसी कॉलेजमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली. या सभेमध्ये अंधश्रद्धेविषयी जनजागृती यावर चर्चा झाली.श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगडचे पदाधिकारी भाऊसाहेब सावंत यांनी सांगून अंधश्रद्धेची अनेक उदाहरणे दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगडचे पदाधिकारी भाऊसाहेब सावंत, निलेश घरत, मोहन भोईटे, हर्षल जोशी यांच्या उपस्थितीत बैठक टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये घेण्यात आली. या समितीत एकूण आठ विद्यार्थी घेण्यात आले असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे विद्यार्थी आपापल्या गावात अंधश्रद्धेविषयी जनजागृती करणार आहेत. सदर सभेला एकूण 25 विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमित बाकडे, दिलीप ढेपे, संजय गायकवाड यांनी सहकार्य केले.

Exit mobile version