• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

चिरतारुण्य हरपलं

Varsha Mehata by Varsha Mehata
February 3, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्वाती पेशवे

रमेश देव आपल्याला सोडून गेले. वय वाढलं की वयाचे आकडे वाढतात आणि एक दिवस निसर्ग आपलं काम करतो. पण रमेशजींच्या मनाला वाढत्या वयाचा स्पर्श कधीच झाला नाही. तो माणूस चिरतरुण होता. त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य कधीच ढळलं नाही. त्यांनी कधीच कोणाला कमी लेखलं नाही. मेहनतीनं यश मिळवणार्‍या रमेशजींनी कधीही फुकाचा अभिमान मिरवला नाही. त्यांचे पाय कायम मातीचेच राहिले.
ज्येष्ठ अभिनेता रमेश देव यांचं निधन ही अत्यंत दुखद बातमी आहे. त्यांच्याबरोबर एका भव्य-दिव्य कारकिर्दीचा अस्त झाला आहे. ‘अतिशय लव्हेबल व्यक्ती’ इतक्या अत्यल्प शब्दात रमेशजींच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करता येईल. अलिकडेच ‘झी’कडून जीवनगौरव पुरस्कार घेताना तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारण्याऐवजी सीमा देव या माझ्या अत्यंत लाडक्या अभिनेत्रीच्या हस्ते मिळाला तर अधिक आवडेल, असं मी सांगितलं होतं. ‘झी’ ने देखील माझ्या या इच्छेचा मान राखला. सीमाजींकडून पुरस्कृत होण्याच्या त्या प्रसंगी रमेश देव आवर्जून हजर राहिले होते तसंच त्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. रमेशजींनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट छाप उमटवली आहे. ‘गहिरे रंग’ या नाटकात देव दांपत्याबरोबर मी काम केलं होतं. त्यात ते नायक-नायिकेच्या भूमिकेत होते. या निमित्ताने मला त्यांचा निकटचा सहवास मिळाला. त्यावेळी ते जुहूला ‘मेघदूत’मध्ये रहायचे. तिथे मी वारंवार जात असे. बरेचदा बरोबर माझी आई असायची. आईशी तर ते दोघे अत्यंत प्रेमाने बोलायचे. तिला आपल्या आईसमान वागवायचे.
मी मुळची कोल्हापूरची. देव दाम्पत्याला मी कोल्हापूरमध्ये प्रथम पाहिलं ते शाळेकरी वयात असताना. त्यावेळी जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांच्या ‘सुवासिनी’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. त्याचे असिस्टंट डायरेक्टर मधुकाका कुलकर्णी माझ्या वडिलांचे परिचित होते. ते आम्हाला चित्रीकरण बघायला घेऊन जायचे. त्यावेळी सेटवर मी प्रथम त्या दोघांना पाहिलं. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल, अशी त्यावेळी अजिबात वाटलं नव्हतं. पण पुढे ही संधी मिळाली आणि त्यांच्या दिलखुलास वृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला. इतकी प्रसिद्धी, पैसा, मान मिळवूनही शेवटपर्यंत निरलस राहिलेलं ते व्यक्तिमत्त्व होतं. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रसृष्टी, रंगभूमीदेखील गाजवली. त्या दोघांबरोबर काम करणं हा सुखद अनुभव असे. पती-पत्नी म्हणून त्या दोघांचे संबंधही वाखाणण्याजोगे होते. त्यातही सीमाताई अधिक चोख. अभिनय, नाटकाचे डायलॉग पाठ करणं या सगळ्यातच त्यांना विलक्षण गती होती. दिलखुलास रमेशजी मात्र बरेचदा नाटकातले संवाद विसरायचे. त्यांचं संहितेकडे दुर्लक्ष व्हायचं. काम जबरदस्त असलं तरी इतर व्यापात नाटकाची नक्कल पाठ करण्यात ते मागे पडायचे. अशा वेळी सीमाताई त्यांच्याकडून पाठांतर करुन घ्यायच्या. ‘नाही रमेश, तो संवाद तसा नाही असा आहे…’ असं त्यांच्यातलं संभाषण मी अनेकदा ऐकलं आहे.
‘गहिरे रंग’ या नाटकाच्या वेळची ही आठवण आहे. या नाटकात नायिका तुरुंगात असते. त्यात एका दृश्यामध्ये सीमा आणि रमेश यांच्यात एक संवाद होता, ‘किती वर्षं मी तुरुंगात काढायची? 14 वर्ष…! 14 महिने…! 14 उन्हाळे…! 14 पावसाळे…’ हा संवाद म्हणताना रमेशजी दर खेपेला वेगवेगळे आकडे म्हणायचे. कधी 16 महिने, कधी 12 महिने, कधी दहा महिने… अशी चूक करायचे. त्यामुळेच सीन संपवून आत आल्यावर सीमाजी मला म्हणायच्या, ‘अगं आशा, आज माझी शिक्षा दोन वर्षांनी वाढली गं…!’ त्यांनी ‘12 वर्ष’ या आकड्यानिशी संवाद म्हटला तर त्या म्हणायच्या, ‘आज त्यानं शिक्षेची दोन वर्षं कमी केली.’ अशी सगळी गंमत चालायची… नाटकाच्या दौर्‍यावर जायचो तेव्हा आम्ही सगळे एकत्र रहायचो. त्या निमित्तानेही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळायचं. या नाटकात माझी एका भाबड्या मुलीची भूमिका होती. यातला माझा गेटअप ‘गुड्डी’मधल्या जया भादुरीच्या गेटअपसारखा होता. ही मुलगी शालेय अभ्यासात मागे होती. त्यामुळे ती एकेका इयत्तेत चार-पाच वर्ष काढत होती. अशी ही थोड्या विनोदी अंगाने जाणारी भूमिका साकारताना मला दाम्पत्याच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू अनुभवायला मिळाला. नाटकातली माझी ‘दुर्गी’ची व्यक्तिरेखा त्यांना इतकी  आवडायची की आपला प्रवेश संपल्यानंतर मेक अप रुममध्ये न जाता ते माझा अभिनय पाहण्यासाठी विंगेत थांबायचे. तुम्हाला माझा कोणता सीन आवडतो, असं मी एकदा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘ते आम्ही सांगणार नाही. कारण यामुळे तू तोच विचार करशील आणि अभिनयातली सहजता हरवून बसशील.’ माझ्या अभिनयात कृत्रिमता येण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी कधीच मला त्यांचा आवडता सीन सांगितला नाही. दुसर्‍याचा इतका विचार करणारे अभिनेते आता दिसतील का? सीमाताईंकडून मी अभिनयातले बारकावे शिकले पण कसं जगावं, अडचणींना कसं तोंड द्यावं हे मी रमेशजींकडून शिकले. रमेश देव आपल्याला सोडून गेले. वय वाढलं की वयाचे आकडे वाढतात आणि एक दिवस निसर्ग आपलं काम करतो. पण रमेशजींच्या मनाला कधीच वाढत्या वयाचा स्पर्श झाला नाही. तो माणूस चिरतरुण होता. त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य कधीच ढळलं नाही. त्यांनी कधीच कोणाला कमी लेखलं नाही. मेहनतीने यश मिळवणार्‍या रमेशजींनी कधीही यशाचा अभिमान मिरवला नाही. मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करणार्‍या रमेशजींचे पाय कायम मातीचेच राहिले. मुख्य म्हणजे शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांनी वृत्तीतली ही सकारात्मकता आणि शरीर-मनाचं आरोग्य जपलं. अखेरपर्यंत ते मनमोकळं बोलत होते. सीमाताईंना सध्या विस्मरणाचा त्रास आहे. मात्र रमेशजी अखेरपर्यंत गप्पांमध्ये हरवलेले असायचे.
रमेशजींच्या अभिनयात एक प्रकारची सहजता होती. चित्रपटात आधी कलाकाराचा चेहरा बोलला पाहिजे आणि मग संवाद आले पाहिजेत. रमेशजींमध्ये हे नेमकेपणानं दिसायचं. कारण प्रत्येक भूमिकेसाठी ते अपार मेहनत घ्यायचे. ‘वेगळं व्हायचंय मला’ हे त्यांचं नाटकंही खूप गाजलं. बाळ कोल्हटकर, राजा परांजपे, राजा नेने असे ख्यातनाम चेहरे त्यात होते. या नाटकाचेही अनेक दौरे झाले. या वेळची एक आठवण संस्मरणीय आहे. या नाटकाच्या तालमी मुंबईला बिर्ला क्रीडा हाऊसमध्ये व्हायच्या. आम्ही सगळे कलाकार तिथे जमायचो. त्यावेळी सीमाताईंची मुले लहान होती. एकदा 11-12 वर्षांचा अजिंक्य तालमीला आला होता. आमचं काम सुरू झाल्यावर तो बोट हाऊसच्या आजूबाजूला खेळू लागला. बाहेर बिर्ला शेटचा उंच पुतळा होता. खेळता खेळता तो त्या पुतळ्याच्या चौथर्‍यावर चढला आणि जवळपास मध्यापर्यंत गेला. तो कुठे दिसत नाही हे लक्षात येताच इकडे सीमा आणि रमेशजी काम सोडून त्याला शोधायला बाहेर पडले. त्यांच्याबरोबर आम्हीही बाहेर आलो. बाहेर बघतो तो लहानगा अजिंक्य चौथर्‍यावर चढलेला दिसला. त्याबरोबर सीमा घाबरल्या आणि त्याला हाका मारुन खाली बोलावू लागल्या. तेवढ्यात रमेशजींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, ‘नलू, गडबड करु नकोस.(रमेशजी सीमा देव यांना ‘नलू’ अशी हाक मारायचे.) त्याला बिचकवू नकोस.’ असं म्हणत ते अजिंक्यला म्हणाले, सावकाश वर चढ आणि त्यांच्या पायाला नमस्कार करुन खाली ये. अर्ध्यातून खाली यायचं नाही. हे बोलतानाचा त्यांचा करारी चेहरा मला अजूनही आठवतो. ते रमेशजी मला अधिक भावले.
त्यांच्यातल्या खंबीर पित्यानं आपल्या मुलाला अर्ध्या वाटेतून परतवलं नाही तर नेहमी पुढेच जाण्याची शिकवण दिली. त्यामुळेच त्यांची दोन्ही मुलं या क्षेत्रात वेगळी ओळख टिकवून आहेत. रमेशजींना विनम्र आदरांजली. त्यांच्या अशा अनंत आठवणी सतत बरोबर राहतील. 
मोठा कलाकार हरपला – अलका कुबल
‘माहेरची साडी’ च्या वेळी माझी रमेश देव यांच्याशी खरी ओळख झाली. अजिंक्यमुळे ते बर्‍याच इव्हेट्सना यायचे. त्या प्रत्येकवेळी ते माझ्या कामाचं भरभरुन कौतुक करायचे. हसतमुख चेहरा, कमालीचा उत्साह ही त्यांची वैशिष्ट्यं प्रकर्षानं जाणवायची. अलिकडपर्यंत ते मालिकेमध्ये काम करताना भरपूर मेहनत घेत असल्याचं मी पाहिलं. वयाच्या 86 व्या वर्षी एखाद्या मालिकेमध्ये काम करणं आणि अत्यंत दमवणार्‍या वेळा सांभाळत संवाद पाठ करणं हे निश्‍चितच सोपं नाही. त्यासाठी देवाची देणगीच असावी लागते. वेळेत येणं, कामाची शिस्त पाळणं हे कोणी त्यांच्याकडून शिकावं. त्यांच्यातला उत्साह अखेरपर्यंत अचंबित करणारा होता. एखाद्या तरुणाच्या तडफेने ते रात्री उशीरापर्यंत काम करताना दिसायचे. एकदा सकाळी गाठ पडली तेव्हा ते चहा आणि पोळीचा नाष्टा करताना दिसले. याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘नाश्त्यामध्ये मी काहीही तेलकट खात नाही. हा परफेक्ट नाश्ता आहे. मी जेवणाची सगळी पथ्यं पाळतो. रात्री न जेवता केवळ ग्लासभर गरम दूध घेतो.’ यावरुनच त्यांच्या आरोग्यसंपन्न जीवनाचं रहस्य मला समजलं होतं. कृष्णधवल काळापासून अगदी आत्तापर्यंतच्या काळापर्यंतच्या कामाचा त्यांचा आलेख आणि आवाका खूप मोठा आहे. एवढी मोठी कारकिर्द गाजवणं अभावानेच पहायला मिळतं. अगदी अलिकडेच त्यांची गाठ पडली होती. मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. आदरानं स्मरावं असं हे व्यक्तिमत्त्व आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांना विनम्र आदरांजली.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रायगड जिल्ह्यात 314 रुग्ण; चौघांचा मृत्यू, 542 कोरोनामुक्त

Next Post

सदाबहार अभिनेता

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

सदाबहार अभिनेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?