तरुणाई रमली भजनांमध्ये

| अलिबाग | प्रमोद जाधव |

मोबाईल, क्रिकेटमध्ये रमणारी तरुणाई आता भजन किर्तनामध्ये ही रमू लागले आहेत. गावागावात 10 वर्षापासून ते 40 वयोगटातील तरुणाई वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन किर्तन करीत असल्याचे पहायला मिळत आहे.

ग्रामीण भागासह शहरी भागात आजही भजन किर्तनाला फार महत्व आहे. गावांमध्ये उत्सव यात्रांसह वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन किर्तन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. पुर्वी भजन किर्तनामध्ये 50 वर्षापुढील वयोगटातील मंडळींचा सहभाग जास्त होता. त्यामुळे विशिष्ट वयोगटातील मंडळी या भजन किर्तनामध्ये सहभाग होत होती. परंतू बदलत्या काळानुसार, भजन किर्तनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. वयाच्या तीन वर्षापासून अनेक मुलांना पालक ताल मृदूंगाचे धडे घेण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत. मोबाईलमधील कॅन्डी क्रश सारख्या खेळांसह क्रीकेट, कबड्डी या खेळाकडे रमणारी तरुणाई आता भजनाकडे आकर्षिक होऊ लागली आहे. वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये भजनांच्या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे भजनांपासून दुर राहणाऱ्या पिढीला भजनाबाबत आकर्षण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दहा वर्षापासून 40 वयोगटातील अनेक मंडळी भजनामध्ये रमू लागली आहे. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजनात त्यांचा सहभाग प्रचंड वाढू लागला आहे. गावांमधील प्रासादिक भजन मंडळात गायन करण्यापासून ताल मृदूंग वाजण्यापासून सहगायक म्हणून भुमिका बजविण्याचे काम तरुणाई करू लागली आहे. त्यामुळे जिल्हयात भजनांचा क्रेझ वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या 35 वर्षापासून भजन गायनाचे काम करीत आहे. पुर्वी 50 पेक्षा अधिक वयोगटातील मंडळी भजनात असायची. परंतू गेल्या दहा वर्षापासून तरुण मंडळीदेखील भजनामध्ये रमू लागली आहे. भजनातील संगीताची आवड तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.गायनाची आवड वाढली आहे.

हरिराम पारंगे-बुवा, श्रीगजानन प्रासादीक भजन मंडळ

गेल्या पंधरा वर्षापासून भजनाला सुरुवात केली. लहानपणापासून गायनाची आवड होती. हार्मोनिअमचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावागावात भजन करू लागलो. दर मंगळवारी सराव ठेवला. पुर्वी विशिष्ट वयोगटातील मंडळी भजनात असायची आहे. आज माझ्याच वयातील मंडळी भजनात असल्याचा आनंद आहे.

मनोहर भोईलकर, आंबेपुर, कुंभारआळी
Exit mobile version