रसदार फळांकडे नागरिकांची ओढ
पाली/बेणसे,प्रतिनिधी
मे महिन्यातील वैशाख ववण्यातील उच्च तापमानाने कहर माजविला आहे. उन्हाच्या ज्वाला असह्य होतात. अशाच लोक उष्माघात होऊ नये, व उन्हाच्या चटक्यापासून शरीराला दिलासा मिळावा, म्हणून रसदार फळांकडे नागरिकांची ओढ वाढली आहे. यामध्ये उसाचा रस, कलिंगड व नारळ पाणी खरेदीकडे नागरिकांचा कल बाजारात दिसून येत आहे.फळांचा रस पिऊन शरीराला गारवा देण्यासाठी नागरिकांचा विविध फळे खाण्यासह त्यांचा ज्यूस पिण्याकडे कल वाढला आहे.
बाजारातील आवक असलेल्या रसदार फळांमध्ये मागणी कलिंगडाची होत असली तरी द्राक्ष, अननस, संत्री, डाळिंब, चिकू, नारळ यांना देखील मागणी वाढत असल्याचे दिसत आहे. फळविक्री दुकानासह रसवंतीवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. अनेक शेतकर्यांनी व्यापार्यांना माल विक्री न करता रस्त्याच्या कडेला दुकान लावून किरकोळ स्वरूपात माल विक्री करताना दिसत आहे. आजही कलिंगड विक्री सुरु असल्याचे दिसते. कोरोनामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत सजग झाला आहे. काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.त्यामुळे सध्या कलिंगड व खरबुज व आंब्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होत असून, 50 ते 100 रूपयांपर्यंत कलिंगड व खरबूज विकले जात आहेत. आंबे 400 ते 700 रुपये डझन आहेत.तसेच वाढत्या उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असल्याने रसदार फळांची मागणी वाढली आहे. भाव कितीही असले तरी लोक आवश्यक ती फळ विकत घेत आहेत.
निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर फळ खाण्यावर भर देण्यास सांगतात . त्यामुळे फळांना मागणी वाढली आहे,फळ महाग असले तरी मागणी मात्र वाढतच आहे. उन्हात कामाशिवाय बाहेर पडू नये, बाहेर जरी पडलो तरी आवश्यक ती ख़बरदारी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतायेत.





