| खांब | वार्ताहर |
मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी उष्णतेच्या प्रमाणात चांगलीच वाढ झालेली असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तर, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे त्यांचे प्रत्यंतर साऱ्यांनाच येऊ लागल्याने परेशान झाले आहेत. उष्णतेपासून गारवा मिळावा म्हणून गुरेसुद्धा झाडाच्या सावलीखाली विसावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मार्च महिन्याचे सुरुवातीला पहाटे व रात्रीच्या सुमारास वातावरणात थोड्याफार प्रमाणात थंडी जाणवत होती. त्यामुळे दिवसाही बऱ्यापैकी वातावरण थंड असायचे. परंतु, मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली व वातावरणात एकाकी उष्णतेचे प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गतवर्षापेक्षा यावर्षी उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. उष्णतेपासून बचाव व्हावा याकरिता दुपारच्या सुमारास शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळा, सुती कपडे वापरा, शरीराला थंडावा देणारा आहार व पेय घ्या जेणेकरून होणारा त्रास हा कमी प्रमाणात असेल असा सल्ला खांब येथील डॉ. महेंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.






