केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 10 एप्रिलपासून कोव्हिड व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित काही राज्यांतील कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.