| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष अलिबाग कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आणि पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकरी भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वेगवेगळ्या आघाडयांच्या पदाधिकारी, सदस्यांची नियुक्ती केली आहे. तरुणांसह महिलांना स्थान दिले आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते यांचाही यामध्ये सहभाग आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देत असताना पक्षाबद्दल असलेली निष्ठा, समाजातील काम याची चाचपणी करूनच अनेकांना पदे दिली आहे. पद नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. पक्ष वाढीसाठी तसेच आगामी येणाऱ्या निवडणूकांमध्ये चांगल्या पध्दतीने प्रत्येकाने काम केले पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. ग्रामीण भागासह शहरी भागात पक्षाचे ध्येय धोरणे विचार जनतेपर्यंत पोहचून पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. रस्ते, रोजगार या विषयांवर बोलण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. हनी ट्रॅप व अन्य विषयांवर जास्त लक्ष दिले जात आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. शेकापच त्यांचे प्रश्न सोडवू शकतो. ही जाणीव करून द्या. असे शेकाप राज्य प्रवक्त्या तथा सोशल मिडीया प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या.






