उपविभागीय अधिकारी संकपाळ यांची जागेची पाहणी
| कर्जत | प्रतिनिधी |
‘सर्वांसाठी घरे-2022′ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात व ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी शनिवारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. त्याआधी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी शासकीय जागेवर जाऊन पाहणी करीत संबंधितांना लवकरच घरे नावावर होतील, असा शब्द दिला आहे.
शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्जत, खालापूर, खोपोली आणि माथेरान विभागाचे तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत शासकीय जागेवरील घरे अधिकृत करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यानुसार कर्जत नगरपरिषद येथील भिसेगाव आदिवासी वाडीत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ हे स्वतः स्थळी जाऊन पाहणी केली. आणि लवकरच घरे नावावर होणार असल्याचे शब्द दिला आहे. याप्रसंगी अमोघ कुळकर्णी, पार्वती वामन वाघ-ग्राम महसूल अधिकारी, शीतल मोरे मंडळ अधिकारी, संतोष जांभळे – मंडळ अधिकारी कडाव, तर नगरपरिषदेचे कार्यालीन अधीक्षक रवींद्र लाड, बापू बहीराम उपस्थित होते.
याबाबत अमोघ कुळकर्णी यांनी शासकीय जागेवरील घरे नियमानुकूल करण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार केले होते. निवडणुकीदरम्यान तत्कालीन मुख्याधिकारी वैभव गारवे, त्यानंतर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी वाडीमध्ये येऊन पाहणी केली. ती वेळेवर बैठकीत विषय घेण्यात येत होता. त्याची अंमलबजावणी झाली असून, लवकरच सर्वांना हक्काचे घरे मिळणार आहे.
शासकीय जागेवरील असलेले घरे नियमकुलीत करण्यासाठी शुक्रवारी महसूल सप्ताहाचे आयोजन केले होते. शासन निर्णयान्वये महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिनानिमित्त ‘सर्वांसाठी घरे 2022′ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात व ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत महसूल व वन विभाग यांच्याकडील दि. 29 जुलै 2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कार्यक्रम आयोजित केले होते. भिसेगावा त पाच आरक्षण पडल्याने विशेष दखल उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी घेतली आहे.





