| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सुरेश घरत यांनी आरसीएफविरोधात आंदोलन केले, किमान वेतनासाठी लढा दिला, पाणी, रस्ते, कोळी बांधवांच्या जेट्टीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या संघर्षाची आणि कामाची दखल घेऊन सानिका घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या लढतीत प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान मोलाचे असून, ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवावी, असे आवाहन ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले. तसेच, सुरेश घरत यांच्याकडे आव्हान स्वीकारण्याचे वाघाचे काळीज आहे. त्यांच्यासाठी या निवडणुकीचा पेपर अगदी सोपा आहे. सुरेश घरत यांचे काम सगळ्यात जास्त आहे. या मतदार संघात त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याची दखल घेत एक नव्या बदलासाठी सुरेश घरत यांची मुलगी सानिका घरत यांची थळ जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार म्हणून निवड शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी या लढतीमध्ये गांभीर्याने बघून योगदान देणे गरजेचे आहे, असे शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या.







