इव्हीएम हॅक होऊच शकत नाही

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

मतदानासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत; परंतु हे यंत्र कोणत्याही वायरीने किंवा वायरलेस यंत्रणेने हॅक करता येत नाही, असे स्पष्ट मत मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केलं. या यंत्रातील कोणताही डाटा काढता येत नाही किंवा नवीन अपलोड करता येत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास ते काम करणे थांबवते. अतिशय सुरक्षित असे हे यंत्र आहे, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे  यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईव्हीएम मशिन कोणत्याही इतर यंत्रणेला जोडता येत नाही. ज्या वायरने ते कनेक्ट केले जाते त्याचे कोड आहेत. त्यानुसारच ते जोडले जाऊ शकते, तसेच कोणी त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ते डिसेबल होते. मशिनला अन्य वायर जोडता येत नाही किंवा वायरलेस यंत्रणेनेही ते हॅक करता येत नाही. टेक्निकल कमिटी असते. त्यांच्या मान्यतेशिवाय हे मशिन चालत नाही. ती एकदा सील केली की, त्यामध्ये काही बदल करता येत नाही, असे देशपांडे यांनी सांगितले.

Exit mobile version