ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
| सारळ | वार्ताहर |
रायगड डाक विभाग अधीक्षक डाकघराकडून ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) 111 जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन अविनाश पाखरे यांनी केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला 2 मे ते 5 जून या कालावधीत http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर अर्ज करावे लागतील, असे देखील सांगण्यात आले आहे. आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा यांची सविस्तर माहितीसाठी वरील संकेतस्थरावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.