बारावी २१ फेब्रुवारी, दहावी २ मार्चपासून परीक्षा

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे.

यंदा परीक्षेचे कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्‍नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Exit mobile version