| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील गणेशपेठ खोती व आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण 172 नागरिकांच्या डोळयांची तपासणी करण्यात आली. यामधील 32 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. गणेश पेठ खोती प्रमुख लीलाधर खोत, मनोहर परकर, राजू पेडणेकर, राकेश शिरवटकर, नंदू भाटकर, संतोष मुरकर, इंद्रकांत तोडणकर, अभिजित मुकादम, संजय तोडणकर यांच्यासह खोतीतील अनेक सदस्य या शिबीर आयोजनात सहभागी झाले होते. यावेळी डोळ्यांची औषधे व माफक दरात चष्मेवाटप केले. तसेच शिबिरात मोतिबिंदू निदान तपासणी व शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली.