कायरा घरतची उत्कृष्ट कामगिरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

गोशीन ऱ्यू कराटे असोसिशनच्यावतीने सोके कप कराटे चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.21) मोहपाडा-रसायनी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौलमधील कायरा अक्षय घरत हीने उत्कृष्ट कामगिरी करीत रौप्य पदक मिळविले. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

कायरा ही मुळची चौलमधील रहिवासी असून सध्या अलिबागमध्ये राहत आहे. कायराला स्वरक्षणाचे धडे मिळाले पाहिजे या भूमिकेतून तिची आई अनन्या घरत यांनी तिला प्रोत्साहन देत कराटेे प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. प्रशिक्षक राहूल तावडे यांच्याकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा तिला चांगला फायदा झाला. वेगवेगळ्या कराटे स्पर्धेत कायराने यश संपादन करीत अलिबागचे नाव लौकीक केले. मोहपाडा-रसायनी येथील श्रीसाईबाबा केंद्र संस्थान सभागृहात कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कायराने वेगवेगळ्या कराटेच्या क्रिडा प्रकारात यश संपादन केले. त्यामध्ये तिने रौप्य व सुवर्ण पदक मिळवून अलिबागचे नाव उंचावले.

Exit mobile version