नोहा लायल्सची उत्कृष्ट कामगिरी

१०० मीटर शर्यतीचे पटकावले सुवर्णपदक

| पॅरिस | वृत्‍तसंस्था |

ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या100 मीटर स्पर्धेत जमैकाच्या किशाने थॉम्पसनला हरवून नोहा लायल्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रविवारी (दि. 4) झालेल्या शर्यतीत अमेरिकन धावपटूने जमैकाच्या किशाने थॉम्पसनला अगदी कमी फरकाने पराभूत करून अव्वल स्थान पटकावले. थॉम्पसनच्या 9.789 सेकंदांपेक्षा केवळ 0.005 जास्त असलेल्या लायल्सने 9.784 सेकंदांच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

Exit mobile version