। पेण । वार्ताहर ।
स्व.प्रमोद (पिंट्या पाटील) यांच्या जयंतीचे औचित्य साधून कबड्डीचा उत्साह, थरार, आणि दंगा, चल घे पंगा… या टॅग लाईनखाली पेण कबड्डी प्रिमिअर लिग चे उद्घाटन मोठया उत्साहात मा.आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेमध्ये नामवंत असे 16 संघ सहभागी असून गेली 15 दिवस या 16 संघाचे प्रशिक्षक खेळाडूंकडून सराव करून घेत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे क्रीडा रसिकांचे म्हणणे आहे. पेण तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची तालुक्यातील तरुण कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजकांकडून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण युट्युब चॅनलवर पहायला मिळणार असल्याने क्रिडा रसिकांसाठी एक वेगळीच पर्वणी असणार आहे.
या स्पर्धेमध्ये ए गटामध्ये शिरिष मानकावळे यांचा रॉयल ईगल, संदिप पाटील वरसई यांचा व्ही मुंम्बा, परशुराम पाटील आणि सजंय डंगर यांचा नेहा अॅन्ड समिरा, निखिल पाटील आणि प्रविण पाटील यांचा निहाल डायनामौझ संघ तर बी गटामध्ये समीर म्हात्रे यांचा सह्याद्री वॉरियर्स, हर्षल पितळे आणि जयेश पाटील यांचा निल अॅन्ड साहिल राइर्ड्स, संदेश ठाकूर आणि महेश पाटील यांचा स्वराली अॅन्ड महेश्वरी वॉरियर्स, मुरलीधर भोईर आणि अविनाश भोईर यांचा ए.एम.इंन्टरपप्रझेस व सी गटामध्ये प्रसाद भोईर यांचा प्रभो पॅथर्स, सुरेश पाटील आणि प्रफुल्ल म्हात्रे यांचा रिध्दी-सिध्दी कस्ट्रक्शन, प्रभाकर म्हात्रे यांचा अभिषेक वॉरियर्स हरि ओम डोलवी, नरेंद्र पाटील आणि निलकंठ पाटील यांचा भाई अॅन्ड भाई चॅलेंजर्स, डी गटामध्ये शैलेश पाटील आणि उमेश पवार यांचा पाटणेश्वर फायटर्स, के.डी.म्हात्रे यांचा रिष सनरायझर बोर्वे, राजेश मोकल आणि जगदिश म्हात्रे यांचा वडखळ टायगर, डी.बी.पाटील यांचा आदेश विनित वॉरियर्स अशा संघामध्ये दोन दिवस स्व.भाई मोहनराव पाटील स्टेडीयम गोविर्ले, हमरापूर वाडा पेण येथे सामने रंगणार आहे. या उदघाटन सोहळयासाठी मा.आमदार धैर्यशील पाटील, अर्थ व बांधकाम सभापती अॅड.निलिमा पाटील, स्मिता प्रमोद पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, आशिष म्हात्रे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.