फडणवीसांना डावलून; गडकरी प्रचार प्रमुख

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार फटका सहन करावा लागला. भाजपाला मोठे यश मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस कमी पडल्याने केंद्रीय नेत्वृत्वाने राज्यात विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रचार प्रमुख म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचारासाठी व इतर नियोजनासाठी चार मंत्र्यांना मैदानात उतरवणार आहेत. प्रचाराची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दिली जाणार आहे. परंतु, लोकसभेतील निकाल पाहता, देंवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांच्याकडे विशेष प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी असणार आहे. नितीन गडकरी यांचा चेहरा विधानसभा निवडणुकीत वापरावा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा भाजपला राज्यात फायदा होईल असे संघाचा अंदाज आहे. नितीन गडकरी हे विशेष प्रचारक, रावसाहेब दानवे हे प्रमुख संयोजक तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

Exit mobile version