अध्यक्षपदी डॉ. वैभव भगत
| अलिबाग | प्रतिनिधी |
वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अलिबाग येथील डॉ. वैभव भगत यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अलिबाग कुरूळ येथील सुरुची हॉटेलमध्ये कोअर कमिटीची बैठक झाली.
रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. महेंद्र दोषी, डॉ. संदेश पाटील, डॉ. आशिष भगत, डॉ. मकरंद आठवले, डॉ. रवी म्हात्रे, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. अनघा भगत, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. उज्वल जैन, डॉ. गणेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी डॉ. वैभव भगत यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा डॉ. सुनिता पाटील यांनी डॉ. वैभव भगत यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविली.
असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी डॉ. अमेय केळकर आणि डॉ. अमित बेनकर, सचिवपदी डॉ. ओमकार पाटील, सहसचिवपदी डॉ. भूषण शेळके आणि डॉ. सुलतान हसवारे, खजिनदारपदी डॉ. वैजेश पाटील, सहखजिनदारपदी डॉ. अभिराज पाटील आणि डॉ. प्रांजली पाटील, स्पोर्टस् सेक्रेटरी डॉ. आदेश मोकल, डॉ. पल्लवी शेळके, कल्चरल सेक्रेटरी डॉ. समीर धाटावकर, डॉ. सोनाली नाईक, ऑर्गनायझर सेक्रेटरी डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. रश्मी गंभीर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आगामी काळात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्याविषयी जनजागृती, आपत्कालीन वेळेत जनतेची मदत करणे व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, असोसिएशनच्या सदस्यांसाठी वैद्यकीय व्याख्याने, स्पोर्ट्स डे आणि कौटुंबिक स्नेहमेळावा साजरा करण्यात येणार असल्याचा मानस डॉ. वैभव भगत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी वाशी येथिल न्यू इरा हॉस्पिटलच्या वतीने डॉ. सुनील कुट्टी, डॉ. चंद्रशेखर आणि डॉ. अमित धांकी यांनी उपस्थित डॉक्टरांना विशेष मार्गदर्शन केले.






