| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना धर्मादाय संस्थेकडे नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत प्रेस असोसिएशनमध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील 27 पत्रकारांचा समावेश आहे. संस्थेचे प्रमुख विश्वस्त संतोष पेरणे यांनी कर्जत प्रेस असोसिएशनचा स्थापना सोहळा कर्जत शहरात आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच, संस्थेच्या सर्व सदस्यांना ओळख पत्र आणि पत्रकारांचा विमा उतरवून त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची घोषणा केली. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष भूषण प्रधान, कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे, उपाध्यक्ष नरेश कोळंबे, उपाध्यक्ष संदेश साळुंके, सचिव कैलास म्हामले, सह सचिव अभिजीत दरेकर, खजिनदार रोशन दगडे, सह खजिनदार जगदीश दगडे यांचा समावेश आहे.







