| उरण । वार्ताहर ।
बहुजनांच्या व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार्या वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील उरण तालुक्याचे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा संघटकपदी रुपेश म्हात्रे, भागवत भूतले उरण तालुका उपाध्यक्ष, निशांत कांबळे तालुका संघटक, मधुकर खंदारे यांची तालुका संघटक, मुजमिल तुंगेकर यांची निवड जिल्हाध्यक्ष प्रदिप ओव्हाळ यांनी नियुक्ती केली. यावेळी वैभव केदारी, तुकाराम खंडागळे, रुपेश म्हात्रे, अमोल शेजवळ, सदानंद सकपाळ, मुजमिल तुंगेकर,मधुकर खंदारे,भागवत भूताळे, विजय मस्के, निशांत कांबळे, रविंद्र देठे, प्रभाकर जाधव, शंकर वाळवंटे, उत्तम लोंढे, गजानन काटेकर, अंजली खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.