| अलिबाग | वार्ताहर |
स्वकष्टार्जित मिळकतीचे वाटप मृत्यूपत्राद्वारे करता येते, स्वकष्टार्जित मालमत्ता वारसांना किंवा अगदी कोणालाही मृत्यूपत्राद्वारे देता येऊ शकते. परंतु वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटप मृतपत्राद्वारे करता येत नाही, अशी माहिती अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, अलिबागच्या कार्यकारिणीची सभा रविवार दि.28 रोजी माजी उपजिल्हाधिकारी स्व. दीनानाथ तरे यांच्या श्रीबागेतील सुयोग निवासस्थानी आयोजित करण्यात आली होते. याप्रसंगी अॅड. प्रदीप घरत यांचे ’मृत्यूपत्र का करावे’ व सुहास पाटील यांचे “ज्येष्ठ व श्रेष्ठ’ या विषयावर व्याख्यान आयोजत करण्यात आले होते. यावेळी शिवशांती स्नेहालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, सहसचिव, तथा ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, सदस्य डॉ. सुरेश म्हात्रे, डॉ. प्रशांत जन्नावार, उद्योजक गजेंद्र दळी, भारती तरे, अॅड. मनोज पडते, सल्लागार शरद कोरडे, चारुशिला कोरडे, श्रीरंग घरत, उमाजी केळुसकर, माजी नगरसेवक आर.के. घरत, मनोहर सुर्वे आदींची यावेळी उपस्थिती होती.
शिवशांती स्नेहालयाची कार्यकारिणी सभा
