। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुका जंजिरा मेडिकल असोसिएशनची सभा मुरुड येथील प्लॉजा हॉटेल येथे संपन्न झाली. या सभेत एकमताने संपूर्ण कार्यकारणीची निवड करण्यात आली. मुरुड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात त्याच बरोबर सामजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले मजगांव येथील डॉ.संजय पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकराणी पुढील प्रमाणे अध्यक्ष डॉ.संजय पाटील, उपाध्यक्ष डॉ.निसार बिरावटकर, डॉ.मंगेश पाटील,सचिव वसीम पेशमाम, खजिनदार सुनील पटेल, आयोजक पदी डॉ.भाविका, कल्याणी, सदफ पेशमाम, सल्लागार पदी डॉ.राज कल्याणी, रविंद्र नामजोशी, डॉ. मकबुल कोकाटे सदस्य डॉ.मयुर कल्याणी, केतकी पाटील,हाशीम उलडे, अन्सार चोगले, यांची या पदी निवड करण्यात आली.