| महाड । प्रतिनिधी |
महाड पोलादपूर तालुका कलाध्यापक संघातर्फे दि. 8, 9 व 10 एप्रिल रोजी चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये निवडक चित्रांचे भव्य चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एकूण 18 कलाशिक्षकांच्या चित्रांचा यामध्ये सहभाग आहे. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन येथील परांजपे विद्या मंदिराचे माजी मुख्याध्यापक सतीश टिपणीस यांचे हस्ते होणार आहे. यावेळी धनंजय देशमुख, डॉ. चेतन सुर्वे, लादूलाल जैन, प्रमोद दीक्षित, सुनीता पालकर, संदीप जाधव, प्रमोद महाडिक,कांचन शेठ, निता शेठ, विद्या देसाई, गंगाधर साळवी यांसह इतर अनेक मान्यवर या उपस्थित होते. यावेळी कलाध्यापक संघातर्फे अध्यक्ष अनिल पालकर, नवीन परमार, दिलीप चांढवेकर, प्रशांत निकम, शरद पाटील, संतोष सुतार, सुभाष जाधव, अनिल आईनकर पदाधिकारी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.