22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत प्रदर्शन राहणार सुरू
| पनवेल | प्रतिनिधी |
गुढीपाडवा सणानिमित्त सोलापूरच्या भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग कापड भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. पनवेल येथील गोखले सभागृहात प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर व नीता माळी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. हातमागावरील विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असते. त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शनाचा पनवेल वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाचे प्रमुख योगेश पोतन यांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी व हातमागाच्या विणकाम करून वापरण्यायोग्य कापड तयार केले जाते. या कापडाच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचे त्वचारोग होत नाही. हे कापड तयार करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागत असल्याने सध्या हातमाग कापडाची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे या व्यावसायामध्ये आमची नवी पिढी येत नसल्याची खंत श्रीधर कटकूर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पांडुरंग पोतन, गोवर्धन कोडम, बाळू कोडम, अमर श्रीराम, गणेश बोल्लू, दीपक गुंडू, रघु कोडम, मनोज म्हंता, अवधूत यांनी उपस्थित होते.
या प्रदर्शनात कॉटन साडी, इरकल साडी, मधुराई साडी, खादी साडी, धारवाड साडी, मधूराई सिल्क साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क साडी, प्रिंटेड ड्रेस, वर्क ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस, कॉटन परकर, टॉप पिस, सोलापूर चादर, बेडशीट, नॅपकिन, सतरंजी, पंचा, टॉवेल, वुलनचादर, दिवाणसेट, प्रिंटेड बेडशीट, पिलो कव्हर, लुंगी, शर्ट, कुर्ता, बंडी, गाहून इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20 टक्के सुट ठेवण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे.