हितेंद्र सिनकरांच्या छायाचित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील छायाचित्रकार हितेंद्र सिनकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 29 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला दृष्टी असे नाव देण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

59 वर्षीय सिनकर हे अलीबाग मधील हवशी छायाचित्रकार आहेत. गेली तीस वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहेत. डॉक्यूमेंट्री आणि फाईन आर्ट या दो प्रकारात ते छायाचित्रण करतात. डॉक्यूमेंट्री या प्रकारात वेगवेगळ्या देशांतील वर्तमानपत्रांमध्ये, वेबसाइटवर सिनकर यांची छायाचित्रे प्रकाशित होत असतात. हितेंद्र सिनकर यांचे हे एकूण पाचवे तर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणारे वैयाक्तिक दुसरे छायाचित्र प्रदर्शन आहे. छायाचित्रणाला कला म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे.

भारतासह,आइसलँड, फ्रांस, मांगोलिया, कंबोडिया, व्हिएतनाम या देशांत हितेंद्र सिनकर यांनी काढलेल्या वेगवेगळ्या विषयावरची कृष्ण धवल आणि रंगीत विवध कलात्मक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसाइटी या प्रसिद्ध संस्थेने 2009 व 2012 साली त्यांच्या दिनदर्शिकेत व शुभेच्छा कार्डसवर हितेंद्र सिनकर यांची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. फाईन आर्ट फोटो हे नावाप्रमाणे कला म्हणून प्रिंट स्वरूपात व्यक्तिगत व गॅलरीमध्ये संग्रहीत ठेवले जातात. या प्रिंटची विक्री भारतत प्रदर्शन मधून परदेशात वेबसाइट माध्यमातून होते. सिनकर यांची छायाचित्रे भारता व्यतिरक्त इंग्लंड, अमेरिका व नेदरलैंड या देशांत व्यक्तिगत संग्रहात आहेत.

Exit mobile version