जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्रांचे प्रदर्शन

| पेण | प्रतिनिधी |

पेण येथील चित्रकार जितेंद्र (जितु) गायकवाड यांच्या चित्रांचे प्रदर्शन दि. 9 ते 15 सप्टेंबरपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे भरवण्यात आले आहे. तरी या प्रदर्शनाला जास्तीत जास्त पेणसह रायगडकरांनी भेट देण्याचे आवाहन चित्रकार जितु गायकवाड याने कृषीवलशी बोलताना केले. त्यांनी सांगितले की, आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रांचे प्रदर्शन करताना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो. परंतु, माझ्या चाहत्यांच्या पाठबळावर मी हा कलेचा धनुष्य उचलत आहे. या अगोदरही जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्रांचे प्रदर्शन मी लावले असून, अनेक कलारसिकांनी त्याला भेट देऊन मला भरभरून सहकार्य केले. यावेळीदेखील आपल्या मातीतील कलाकाराच्या कलेला भेट देऊन सहकार्य करावे.

Exit mobile version