‘ग्रामीणता‌‘ विषयांवरील चित्रांचे मुंबईमध्ये प्रदर्शन

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील प्रसिद्ध आंतराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार रुपेश पाटील यांच्या ‌‘ग्रामीणता‌‘ विषयवारील चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध नेहरू आर्ट गॅलरीमध्ये दि.23 ते 29 जानेवारी या कालावधी मध्ये प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यटन विभागाचे डायरेक्टर हनुमंत हाटे यांच्या हस्ते होणार आहे.

चित्रकार रुपेश पाटील यांची अनेक प्रदर्शने राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर झाली आहेत. रुपेश पाटील यांना विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत.  तसेच, रुपेश पाटील यांना  नेपाळ, झी 24 तास अश्या विविध ठिकाणी चित्रांचे प्रात्येक्षित करण्यासाठी आमंत्रित केले होते. रुपेश पाटील यांचे चित्रे जगभरातील विविध देशात पोहचली आहेत. यावेळी ‌‘ग्रामीणता‌‘ या चित्रप्रदर्शनात चित्रकार रुपेश पाटील यांनी साकारलेली तब्बल 30 चित्रे रसिक प्रेषकांना पाहवयास मिळणार आहे.

Exit mobile version