| उरण |वार्ताहर |
जे एन पी टी सेंट मेरी शाळेचा दहावी चा विद्यार्थी वरद विलास गावंड याच्या विविध कलाकृती चे पेंटिंग चे प्रदर्शन मल्टिपर्जप हॉलमध्ये भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन कॉ भूषण पाटील व विजय दिवाण यांच्या हस्ते झाले या प्रदर्शनाला नीला आपटे, सुधाकर पाटील, शेखर पाटील आदी मान्यवर हजर होते. दोन दिवसातील या प्रदर्शनात वरदने विविध कलाकृती सादर केल्या होत्या त्याच्या पेंटिंग मधून जिवंत पणा भावत होत्या महापुरुष यांची चित्रे व्यक्तिचित्र निसर्गचित्रे पक्षी, प्राणी यांची चित्रे वास्तवपणाचे दर्शन घडवीत आहेत असे दिसत होते. या चित्रामधून विविध रंग छटा दिसत होत्या. या अगोदर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील 50 स्वातंत्र्यसैनिकांची यांची चित्रे तर चिरनेर जंगल सत्याग्रह मधील हुतात्मे यांची चित्रे रेखाटली आहेत.