मोहोपाड्यात प्रदर्शन, विक्री मेळावा

| रसायनी | वार्ताहर |

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्यावतीने स्थानिक महिला बचतगट आणि महिला गृह उद्योग यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन आणि विक्री देण्यासाठी दि. 8 आणि 9 जून रोजी मोहपाड्यातील जनता विद्यालय येथे दोन दिवसांसाठी प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही दिवशी प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला गृहउद्योगाला प्रोत्साहन आणि व्यवसाय देण्यासाठी रसायनिकरांनी मेळाव्याला भेट दिली आणि सर्व स्टॉल मालकांना त्यांची उत्पादने खरेदी करून पाठिंबा दिला. या मेळाव्याला वासंबेचे सरपंच उमा मुंढे, निलम पाटील व इतर सदस्यांनी स्टॉलला भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सद्गुणा पाटील व इतर सहकाऱ्यांनी मेळाव्याला भेट दिली.

रोटरी क्लबचे सदस्य सुनील कुरूप, बाळकृष्ण होणावले, अनुराधा होणावले, गणेश म्हात्रे, उमा मुंढे, वर्षा पाटील, राजू गायकवाड, रेवती गायकवाड, डॉ. शीतल भगत, डॉ. मिलिंद भगत, अमित शाह, जयश्री पाटील, विजय पाटील, शारदा काळे, देवेंद्र महिंद्रकर, शशिकांत शानभाग, अमित शानभाग, राम गाताडे, रश्मी गाताडे, सुशांत उचिल, डॉ. लेखा उचिल, सुनील भोसले, सदगुणा पाटील, प्रतीक्षा कुरंगळे, सचिन थोरात, आशु गर्ग, रश्मी गर्ग, प्रवीण पवार , जगताप, संचिता पाटील, डॉ. धीरज जैन, डॉ. स्विटी जैन, मेघा कोरडे, स्नेहल कोरडे यांनी मेळाव्यात येऊन महिला गृहउद्योग व महिला बचतगटाला भेट देऊन तसेच, वस्तु खरेदी करून महिलांस प्रोत्साहन दिले.

Exit mobile version