बुद्धपौर्णिमेच्या दिवशी तीन ठिकाणी मंचाण
। पनवेल । प्रतिनिधी ।
दरवर्षी प्रमाणे यंदादेखील बुद्ध पौर्णिमेच्या रात्री कर्नाळा पक्षी अभय आरण्यात प्राणी गणना करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रक्रियेला शास्त्रीय पुरावा नसल्याने आता या प्रक्रियेला निसर्गअनुभव नाव देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाकरीता अभयाराण्यात तीन ठिकाणी पाणवठ्यावर मंचान तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी येणार्या प्राण्यांचे फोटो कॅमेरात कैद करुन आणि पाऊलखुणांवरुन प्राण्यांच्या संख्येची गणना करण्यात येत असते. निसर्ग अनुभवाचा हा दिवस प्राणीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांसाठी पर्वणीचा दिवस ठरत असल्याने देशभरातील अरण्यात आयोजित कार्यक्रमात असंख्य प्राणीप्रेमी आणि अभ्यासक भाग घेत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यात गुरुवारी (दि. 23) ते शुक्रवारी (निसर्ग अनुभवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता अभयारण्य परिसरातील कल्हे तसेच आपटा आशा तीन पाणवठ्याच्या ठिकाणी मंचान तयार करण्यात आले असून, या ठिकाणी तैनात वनविभागाच्या कर्मचार्यांकडून ट्रॅप कॅमेर्याच्या साहाय्याने पाणवठ्यावर येणार्या प्राण्यांची गणना करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाळा पक्षी अभय आरण्याचे वनअधिकारी नारायण राठोड यांनी दिली आहे.
मुबंई-गोवा महामार्गावर पनवेल पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभय आरण्यात विविध प्रजातीच्या वृक्षासोबत पशु पक्षांचे वास्तव्य आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देश भरातील अभय आरण्यातील प्राण्यांची गणना केली जात असल्याने कर्नाळा पक्षी अभय आरण्यात देखील वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव प्रेमींच्या मदतीने प्राणी गणना करण्यात येणार आहे.वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात. त्यामुळे अरण्यातील प्राणी पाणी पिण्यासाठी हमखास पाणवठ्यावर येत असतात.करोना काळातील काही वर्ष वगळता कर्नाळा पक्षी अभय आरण्यात दर वर्षी प्राणी गणना करण्यात येते.आता मात्र या प्रक्रियेला निसर्ग अनुभव असे नाव देण्यात आले आहे.
दुपारपासूनच अधिकारी मंचाणावर कर्नाळा पक्षी अभयारण्या 3 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक मंचाणावर दोन कर्मचारी बसणार असून, त्यांच्यासोबत प्राणी गणनेसाठी उपस्थित राहणार्या वन्य प्रेमीना देखील बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.तर पाणवठ्या च्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी 8 पर्यत ही प्राणी गणना सुरु राहणार आहे.