व्याख्यानमालेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
एस.एन.डी.टी  महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे 23 वी  र. धों. कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे पुष्प डॉ. अरुण गद्रे यांनी गुंफले. या व्याख्यानमालचे अध्यक्षस्थान एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी भुषविले. या व्याख्यानमालेत डॉ. अरुण गद्रे यांनी प्रजनन आरोग्य आणि त्याचे व्यापारीकरण संदर्भातील प्रश्‍न आणि त्याचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version