अल्पवयीन मुलींचे शोषण

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
दोन अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरुन गोरेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.आरोपीने या दोन्ही लहान मुलींना घरी बोलावून त्यांच्याशी लैंगिक वर्तन केले.तसेच त्यांच्या हातात 50 रूपये देवुन त्यांना घरी पाठवुन दिले. याबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव प्रवीण पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version