। झारखंड । वृत्तसंस्था ।
जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला असून या स्फोटात संपूर्ण परिसरात गर्दी होऊन भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. प्लांटला आग लागल्याने व गॅसची गळती झाल्यानंतर कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सकाळी 10.20 वाजता ही आग लागली. तात्काळ अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. आयएमएमएम कोक प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 आणि 7 मध्ये ही घटना घडली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.