| पुणे | वृत्तसंस्था |
येथील कात्रज परिसरात 18 ते 20 सिलिंडरचा स्फोट झाला. गंधर्व लॉन्स परिसरात ही घटना घडली. यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला आहे. नेमका हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, या स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल असून, संपूर्ण परिसरात आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्य सुरु असल्याचं कळतंय.
कात्रजमध्ये आगडोंब; अनेक सिलिंडरचा स्फोट
