। अलिबाग । वार्ताहर ।
खोपोलीत अनेक दिवसांपासून चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने रायगड पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीत महीलेने केलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.
खोपोलीतील बाजारपेठ परिसरात काही दिवसापासून चोरीचे गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देवून रायगड पोलीस अधीक्षक, अशोक दुधे यांनी पोलिसांना आदेशित केले होते. विशेष पोलीस पथक नेमून त्यांनी घडलेल्या घटनेच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही फुटेज संकलित करून ते जिल्ह्यात आणि राज्यात प्रसारित करून आरोपित व तिचे सह साथीदार यांची ओळख पटवली. आरोपी महिला हिचेवर महाराष्ट्र राज्यातील पुणे, नवी मुंबई, मुंबई, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटक, हैद्राबाद राज्यात 20 ते 25 चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपित महिला व तिचे फरारी साथीदार यांना पकडण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. सदर महिला आरोपी हिस सातारा जिल्हा येथून खोपोली पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने खोपोली येथील ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याची कबुली दिली असून चोरून नेलेला माल अहमदाबाद, राज्य-गुजरात येथील ज्वेलर्स दुकानदार यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने विशेष पोलीस पथक त्या ज्वेलर्सकडे जावून त्यांनी मालकास ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 60 हजार रुपये किमतीचा 14 गॅ्रम वजनाचा सोन्याचा सर जप्त केला आहे.
सदर महिलेवर खोपोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं.317/2021 भा.द.वि.कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून रायगड पोलीस अधीक्षक, अशोक दुध व विशेष पोलीस पथक यांच्या प्रयत्नातून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे.