| लाहोर | वृत्तसंस्था |
विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमधील सर्व परदेशी चेहरे बाहेर होण्याची शक्यता आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तातडीची बैठक बोलावणार आहे, त्यानंतर पाकिस्तान संघाच्या सर्व परदेशी प्रशिक्षकांना बडतर्फ केले जाऊ शकते. अशी चर्चा सुरु आहे. पाकिस्तान संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये वरच्या पदांवर जास्त परदेशी चेहरे आहेत.
टीम डायरेक्टर मिकी आर्थर आहे. ग्रँट ब्रॅडबर्न हे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि फलंदाजी प्रशिक्षकपद अँड्य्रू पुटिक यांच्याकडे आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांच्याकडे पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद होते, मात्र त्यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.