| पंढरपूर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणार्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून शनिवार, दि 10 जुलै 2021 पासून ते सोमवार, दि. 02 ऑगस्ट 2021 अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत होते पण या दिलेल्या मुदतीत बर्याच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व संबंधित बाबींची पूर्तता होऊ शकली नाही त्यामुळे आता डी. फार्मसी प्रवेशाच्या रजिस्ट्रेशनची मुदत आणखी वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता दि.10 ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी), पंढरपूरचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.
या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर 13 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दि.14 ते 18 ऑगस्ट या दरम्यान करता येईल. 20 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या वींशारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर पाहता येईल. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आपल्या प्रवर्गानुसार योग्य ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण व ज्यांना डी.फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे आणि अगोदर दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केलेले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एन.ए दांडगे (मोबा.क्र. 9373091041) यावर संपर्क साधावा.







