गाळे विक्रीच्या योजनेकरिता मुदतवाढ

। नवी मुंबई । वार्ताहर ।
सिडको महामंडळाच्या 153 निवासी, 18 निवासी तथा वाणिज्यिक वापराच्या भूखंडांसह 275 वाणिज्यिक गाळे विक्रीच्या योजनेच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. अक्षय्य तृतीया तसेच रमजान ईदच्या प्रसंगी नागरिकांना या सुवर्णसंधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता यावा यासाठी सिडकोतर्फे सदर योजनांना मुदत वाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील ऐरोली, नेरूळ, खारघर, पनवेल आणि कळंबोली नोडमधील मोक्याच्या ठिकाणी निवासी तथा वाणिज्यिक वापराचे 18 भूखंड उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच नवी मुंबईच्या विविध नोडमधील सिडकोच्या प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पांतर्गत तसेच व्हॅलीशिल्प आणि स्वप्नपूर्ती गृहसंकुलांतील एकूण 275 वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. 153 निवासी वापराच्या भूखंडांकरिता अर्ज सादर करण्यास व अनामत रक्कम भरण्यास 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बंद निविदा सादर करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेस 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर योजनेचा निकाल 9 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
18 निवासी तथा वाणिज्यिक वापराच्या भूखंडांकरिता अर्ज सादर करण्यास व अनामत रक्कम भरण्यास 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बंद निविदा सादर करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेस 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर योजनेचा निकाल 9 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 275 वाणिज्यिक गाळ्यांकरिता अर्ज सादर करण्यास व अनामत रक्कम भरण्यास 17 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बंद निविदा सादर करण्यास 16 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-लिलाव प्रक्रियेस 17 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर योजनेचा निकाल 20 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सदर योजनांच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी सिडकोच्या ुुु.शर्रीलींळेप.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version