एसटीच्या स्मार्ट कार्डला मुदतवाढ

| मुंबई | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी अपूर्ण असल्याने एसटी महामंडळाने कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत स्मार्ट कार्ड नसतानाही प्रवाशांना एसटीच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी व वितरण झाले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून 31 डिसेंबरपर्यंत शंभर टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

Exit mobile version