| अलिबाग | वार्ताहर |
कॉटन हँडलूम साडी महोत्सवाची ग्राहकांच्या आग्रहानुसार 9 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. हातमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री अलिबाग येथील पोस्ट ऑफिससमोरील सार्वजनिक वाचनालय, डोंगरे हॉल येथे सुरू आहे. नवीन हातमाग कपड्यांचे वेगवगळे प्रकार एकाच ठिकाणी पाहता व खरेदी करता येणार आहेत. तरी, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचा रविवारी (दि.9) शेवटचा दिवस असून, त्यामध्ये नवीन वेगवगळया प्रकारच्या ईरकल कॉटन साडी, इरकली सिल्क साडी, मधुराई कॉटन, खादी कॉटन, धारवाड साडी, सेमी पैठणी, खादी सिल्क, साडी प्रिंटेड, साडी वर्ड तसेच ड्रेस मटेरियल, खादी ड्रेस मटेरियल, लेडीज हँडबॅग, टॉप-पीस, कॉटन परकर, खादी ड्रेस मटेरियल, कॉटन गाऊन याशिवाय असंख्य प्रकारच्या मालावर 20 टक्के सूट देण्यात आलेली आहे. सोलापूर हँडलूम कॉटन साडी व ड्रेस मटेरियल महोत्सव प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.







