पंतप्रधान किसान सन्मान योजनेत केवायसीची मुदत वाढ

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 10 हजार 336 लाभार्थी असून त्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयातून किसान सन्मान योजनेचा लाभ मिळतो. त्यासाठी दरवर्षी आधारकार्ड आणि पॅनकार्ड हे योजनेच्या खात्याशी लिंक करावे लागते. यावर्षी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केले नाही. मागील निर्धारित मुदतीत कागदपत्रे लिंक न केलेल्या शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पेन्शन मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकर्‍यांनी खाते संबंधीचे आधारकार्ड 30 ऑगस्टपर्यंत लिंक करावे, असे आवाहन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.

Exit mobile version